आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा, २७ जानेवारीला होणार मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात तिसरी नगर परिषद निर्माण झालेल्या  आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा  निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आयोगाने जाहीर केला आहे. २७ जानेवारी २०१९ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.  
राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची अधिसूचना जारी केली. कार्यक्रमानुसार, २ ते ९ जानेवारी २०१९ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. १० जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करुन वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १७ जानेवारी ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येईल, तर २८ तारखेला मतमोजणी करण्यात येईल. निवडणुकीबाबत  कोणत्याही रिट याचिकेमध्ये न्यायालयाचा स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास निवडणूक कार्यक्रम तत्काळ रद्द वा स्थगित करुन आयोगास अवगत करावे, असे निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-27


Related Photos