महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथे वन्य प्राण्यांची शिकार : वनविभागात खळबळ, आरोपी फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : ताडोबा व्याघ्र प्रकल्पतील शिवणी प्रादेशिक वनपरिक्षेत्रात हा प्रकार उघडकीस आला असून सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रांतर्गत वन्यप्राण्यांचे अवशेष असल्याची गोपनीय माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. हे अवशेष असल्याच्या माहितीवरून शिवणीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सर्च वॉरंट घेऊन एसटीपीएफ व पीआरटी चमूच्या मदतीने आरोपी मुरलीधर गायकवाड याच्या घराची व शेताची तपासणी केली. असता वन्य प्राण्यांची हाडे आढळून आली असून, ताडोबाच्या बफर क्षेत्रातील या घटनेमुळे वनविभागात चांगलीच खळबळ माजली. दरम्यान, आरोपी फरार झाला आहे.

शिवणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. तुपे यांनी तपास केले असता शेतात व घरी वन्य प्राण्यांचे हाडे आढळून आली असून, ती जप्त करून भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बफर क्षेत्राचे उपसंचालक कुशाग्र पाठक, सहाय्यक वनसंरक्षक येडे. यांच्या मार्गदर्शनात व वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली. या कारवाई दरम्यान क्षेत्रसहाय्यक बुल्ले, पेंदोर, प्रधान, वनरक्षक मेश्राम, चहांदे, गायकवाड, ठाकरे, मडावी, लोखंडे, सावसाकडे, कोवे, शेख, सोनडवले, भरणे, आणि इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

आरोपीची माहिती देणाऱ्यास बक्षीस 

भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कायद्याप्रमाणे वन्य प्राण्यांची शिकार करणे, हाडे व अवशेष बाळगणे हा गुन्हा असल्याने अशा प्रकारचे कृत्य कुणीही करू नये, या प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल.





  Print






News - Chandrapur




Related Photos