तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर नियुक्ती न स्वीकारलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे.   मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंची कमी महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली आहे. याआधी नाशिक महापालिका आयुक्तपदावरून मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून महिनाभरापूर्वी बदली करण्यात आली होती. मात्र त्या पदाचा पदभार मुंढे यांनी स्वीकारलाच नव्हता. त्यामुळे शासनाने त्यांची पुन्हा एकदा बदली केली आहे. 
तुकाराम मुंढे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ताडसोना गावात झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले तुकाराम मुंढे यांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्या वडिलांनी सर्व प्रयत्न केले. महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते औरंगाबादला गेले. २००५ मध्ये ते UPSC परीक्षेत पास झाले आणि IAS अधिकारी बनले.  विशेष म्हणजे ते देशात २० वे आले होते.
तुकाराम मुंढे कामावर रुजू होताच धडाडीने निर्णय घेतात. मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते लोकप्रिय झाले. लोकं देखील आज त्यांच्या मागे उभे राहताना दिसतात. पण दुर्दैव म्हणजे त्यांची लवकरच बदली होते. तुकाराम मुंढेच्या आतापर्यंत अनेकदा बदल्या झाल्या आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2018-12-27


Related Photos