महत्वाच्या बातम्या

 बसफेऱ्या सुरू करा आगार प्रमुख राज्य परिवहन मंडळ गडचिरोली : अभाविपची मागणी.


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : अभाविप व सुपरिचित आहातच अभाविप गेल्या 75 वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अविरतपणे काम करते आहे. अभाविप देशातिल नव्हे तर जगातिल सर्वात मोठी विध्यार्थी संगठना आहे. विविध मार्गांवर बसफेऱ्या सुरू करून विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्य परिवहन महामंडळाच्या आगार प्रमुखांकडे निवेदनातून केली आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी अभाविपने गडचिरोली जिल्हातील विविध ठिकाणी बससेवा सुरु करावी या करिता राज्य परिवहन मंडळाच्या आगार प्रमुखकडे निवेदन दिले मात्र आज येवढे महिने उलटून सुद्धा विविध ठिकाणी बस सेवा सुरु करण्यात आली नाही.

1) चामोर्शी-गडचिरोली, गडचिरोली- चामोर्शी या मार्गाविर दुपारला व संध्याकाळला नियमित पणे बस सेवा सुरु करावी. 2) सिरोचा -ब्रम्हपुरी, नागपूर या बसेसचे कंडक्टर मुलांना बस मध्ये बसू देत नाही या वर कारवाही करावी 3) गडचिरोली तालुक्यातील गडचिरोली ते रानखेडा या मार्गावर बसफेरी सुरु नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी 7 व दुपारी 12.30 वाजता बसफेरी सोडण्यात यावी. असे अनेक समस्या विद्यार्थ्याला येत आहेत.

विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महिना भरात संबंधित मार्गावर बसफेऱ्या सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही अभाविपचे जिल्हा संयोजक चेतन कोलते यांनी दिला आहे. निवेदन देते वेळी गडचिरोली नगर मंत्री अभिलाष कुणघाडकर, आरमोरी भाग संयोजक प्रणय मस्के, शितल कुडवे, कपिल लटारे, जिल्हा संघटन मंत्री राहूल श्यामकुवर यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos