महत्वाच्या बातम्या

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युवक काँग्रेस कडून पोस्टकार्ड पाठवून विचारले उत्तर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपुर : प्रदेश व बल्लारपुर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई व मोदी अदानी भ्रष्टाचार संबंधी प्रश्न विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३००० पोस्ट पूर्व सांसद नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात पोस्ट कार्ड पाठवण्याचे मोहीम शुभारंभ करण्यात आले. नगर परिषद चौक, बस्ती विभाग, पेपर मिल गेट जवळ अनेक लोकाने कार्ड भरून दिले. महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सहसचिव चेतन गेडाम व युवक काँग्रेस बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष जुनैद सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात पोस्ट कार्ड मोहीम सुरू करण्यात आलेले आहे. प्रदेश व बल्लारपुर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पोस्टकार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध प्रश्न विचारून उत्तर देण्यासाठी पोस्ट कार्ड पाठवण्यात आले. या पोस्ट कार्ड मध्ये राहुल गांधी यांच्यावर केलेल्या अन्यापूर्वक कारवाईवरील प्रश्न व मोदी आदानी यांच्यातील भ्रष्टाचारातील संबंध यावर विविध प्रश्न पाठवण्यात आलेले आहे. त्यात २ करोड़ रोजगार कधी मिळनार?, अच्छे दिन केव्हा येणार?, काळा धन केव्हा येणार?, सरकारी संपत्ति का विकन्यात येत आहे? देशातील रुपया का कमजोर होत आहे आणि नोट बंदी करण्यास कोणी सांगितले?. नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चौकसी, विजय माल्या, यांना आपल्या देशातुन  दुसऱ्या देशात कोणी पाठविले? शेतकऱ्याचे आय दुप्पट केव्हा होणार?, अडानी भाजपाला किती करोडाचे फंड दिले?, ४०० रुपयाचा सिलेंडर १२०० रूपयात, ७० चा पेट्रोल १०५ रुपयावर वर गेला या साठी कोण जबाबदार आहे? असे अनेक प्रशन विचारण्यत आले.

प्रदेश सहसचिव चेतन गेडाम आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की देशाची वाटचाल हुकूमशाही कडे चालू आहे. राहुल गांधी वरील केलेली कारवाई लोकशाही विरोधी आहे. आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आज पोस्ट कार्ड आम्ही पंतप्रधानास पाठवीत आहे ते मध्येच गहाळ होईल. या पोस्ट कार्ड मधून पंतप्रधानास प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी पूर्व गट नेता न.प. देवेन्द्र आर्य, अरविंद वर्मा, सुनील मोतीलाल, प्रांजल बालपांडे, राजेश केसकर, संजु सुददला, नकुल राऊत, रोहित खान, राहुल माकोडे, आश्चर्य माकोडे, अक्षय वाढरे, दीपक भास्कर, अमर बोरकुटे, सोनु आमटे, उमेश वर्मा, शकील शेख़, तूषार निषाद, सुशील तोडेकर, रुपेश भोयर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos