५ जानेवारीला राज्यातील विविध खात्यातील अधिकारी संपावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात ५ जानेवारीला राज्यातील विविध खात्यातील अधिकारी संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सामुदायिक रजा आंदोलन होणार असल्याने राज्यातील जनतेला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
 येत्या जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करावा,  केंद्र सरकारप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू करावा,  सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून ६० वर्षे करावी,  सरकारच्या विविध विभाग आणि खात्यांमध्ये रिक्त पदांची संख्या मोठी आहे, ही रिक्त पदं तातडीने भरावीत. आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले असून राज्यातील जवळपास दीड लाख अधिकारी या आंदोलनात सहभागी होतील, असा दावा महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाने केला आहे.    Print


News - Rajy | Posted : 2018-12-25


Related Photos