महत्वाच्या बातम्या

 रेल्वे प्रवास दरम्यान मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक : २७ मोबाईल जप्त 


- एलसीबी लोहमार्ग नागपूरची कामगिरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : रेल्वे प्रवासी गाड्यावर मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना २७ मोबाईलसह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर पोलिसांना यश आले. रेल्वे स्थानक बल्लारशाह चंद्रपूर दरम्यान रेल्वे प्रवासी गाड्यावर व परिसरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी कारवाही करणेबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर येथील पथक रेल्वे स्थानक बल्लारशाह येथे १ एप्रिल ला आले असता त्यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काझीपेठ एंड कडील सिग्नल आउटर वरून चार चोरांना मोठ्या शिताफीने पकडुन विचारपूस केली असता त्यांनी रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांचे मोबाईल चोरून नेल्याचे सांगितले.

त्यांच्या कडून २७ विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल एकूण किंमत ३,५६,००० रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून आरोपी नामे शेख इक्रिमा शेख फिरोज वय १९ वर्ष रा. साईबाबा वार्ड बल्लारपूर, जि. चंद्रपूर, करण तुळशीदास जीवने वय २१ वर्ष रा. सातनल चौक, आंबेडकर वार्ड बल्लारपूर जि. चंद्रपूर, अमन मखदून शेख वय २१ वर्ष रा. राणी लक्ष्मीबाई वार्ड  बल्लारपूर जि. चंद्रपूर, पंकज हिरालाल विनक वय २१ वर्ष रा. गौरक्षण वार्ड बल्लारपूर जि. चंद्रपूर यांना अटक करण्यात आले आहे. पुढील कारवाहीकामी करीता आरोपी व जप्त मुद्देमालासह रे. पो. स्टेशन वर्धा यांच्या ताब्यात दिले. 

सदरची कारवाही श्रीमती वैशाली शिंदे पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर व अनंत तारगे उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग अकोला यांच्या मार्गदर्शनात विकास कानपेल्लीवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांचे सूचने नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण भिमटे, पोलीस नायक विनोद खोब्रागडे, नितीन शेंडे, पोलीस शिपाई रोशन अली तसेच रे. पो. चौकी बल्लारशाचे शिपाई पंकज बांते, संदेश लोणारे व निलेश निकोडे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos