महत्वाच्या बातम्या

  अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई द्या : साजा क्र. २१ कोरेल्ली (बु) येथील शेतकऱ्यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : साजा क्र. २१ कोरेल्ली (बु) येथील शेतकऱ्यांचे  अवकाळी पावसामुळे धान पिकाचे नुकसान झालेले होते. त्यावेळी तलाठी, कोतवाल, प्रत्यक्ष शेताची पाहणी केले. पंचनामा करून नुकसान भरपाई करीता तहसिल कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते.

याकरीता सर्व साजातील नुकसान भरपाई मिळालेली परंतू कोरेल्ली (बु) साज्यातील शेतकरी लाभार्थ्यांचे नुकसानग्रस्त यादीमध्ये नांव असून देखील अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. याकरीता चौकशी करून लवकरात लवकर नुसार भरपाई देण्यात यावे, अशी मागणी साजा क्र. २१ कोरेल्ली (बु) येथील शेतकऱ्यांनी केले आहे. 

जर रनुकसान भरपाई न दिल्यास ११ एप्रिल २०२३ ला शेतकरी लाभार्थी तहसील कार्यालय अहेरी समोर मागणी उपोषण करणार, असा इशारा देण्यात आलेला आहे.   

यावेळी आनंदराव पत्रुजी दुर्गे, कपीलदेव कोहला आत्राम, शिवराम दाउजी चांदेकर, शिवराम जैराम गर्गम, राकेश बोडडा वेलादी, लक्ष्मण वाले कुळमेथे, केसा पोच्या आत्राम, कारे मासा मडावी, चैतू पोच्या आत्राम, नामदेव कोलू गावडे, बिचे दस्सा मडावी, बाजू मादी कुळमेथे, लुला झुरू गावडे, शामु चुक्कु आत्राम, म्हारू दामा गावडे, ललसु पांडू पुंगाटी, दामा मुरा गावडे आधीची उपस्थिती होती. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos