महत्वाच्या बातम्या

 वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सैनिक दरबारचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सेवारत सैनिक व माजी सैनिकांच्या जिल्ह्यातील विविध विभागात प्रलंबित असलेल्या वैयक्तिक तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सैनिक दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. 12 एप्रिल रोजी आयोजित सैनिक दरबारमध्ये उपस्थित राहण्याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे 10 एप्रिल रोजी आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करुन टोकन प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ज्या सेवारत व माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटूंबियांच्या समस्या, वैयक्तिक तक्रारी  जिल्ह्यातील विविध विभागात, कार्यालयात प्रलंबित असतील त्यांनी तक्रार दाखल करण्याकरीता 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कार्यालय येथे कागदपत्रानिशी दोन प्रतीत अर्ज सादर करुन टोकन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा.

उशिरा येणारी प्रकरणे पुढील सैनिक दरबारात विचारार्थ घेण्यात येतील. तक्रार वैयक्तिक स्वरुपात असावीत, मोघम स्वरुपात तक्रारी तसेच न्यायप्रविष्ठ न्यायालयात तसेच लोकशाही दिनात निकाली निघालेली प्रकरणे स्विकारल्या जाणार नाही, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला. ले. धनंजय सदाफळ यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos