महत्वाच्या बातम्या

 सार्वजनिक वाचनालय व व्यायाम शाळा इमारतीचे लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय पर्व उपक्रमांतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत देवळी येथे सार्वजनिक वाचनालय व व्यायाम शाळा इमारतीचे केंद्रीय पेट्रोलीयम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी खा. रामदास तडस, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, नगर परिषद प्रशासक महेंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी मिलींद साटोणे उपस्थित होते. एप्रिल महिन्यातील थोर पुरुषांच्या जयंती व विविध दिवसांचे महत्व लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अभिनव पध्दतीने अभिवादन केले जाणार आहे.

यानुसार 1 एप्रिल ते 1 मे या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय पर्व उपक्रम राबविण्यात येत आहे. या कालावधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे, संपूर्ण महिनाभर जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने शिक्षण विभागाशी समन्वय साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत जात प्रमाणपत्र देणे.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, आश्रमशाळा, निवासी शाळा, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतरही महापुरुषांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य आदीचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुका व जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्तरावर साहित्य वाटप करण्यासोबतच योजनांची माहिती देण्यात येणार आहे, असे समाज कल्याण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos