शिक्षक उशिरा आल्याने दप्तरांचे ओझे घेवून विद्यार्थी शाळेबाहेर खोळंबले


- पाथरी जि.प. शाळेतील प्रकार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पाथरी :
सकाळच्या शाळेला थंडीत कुडकुडत गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकच उशिरा आल्यामुळे बाहेरच पाठीवर दप्तराचे ओझे घेवून ताटकळत उभे रहावे लागल्याचा प्रकार आज २४ डिसेंबर रोजी जि.प. उच्च प्राथमिक शाळा पाथरी येथे उघडकीस आला आहे. 
विद्यार्थी सकाळी पावणेआठ वाजता शाळेबाहेर उभे दिसताच तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी विचारणा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही ७ वाजताच शाळेला उपस्थित झालो मात्र शिक्षकच आले नसल्याची व प्रवेशद्वार उघडण्यातच आले नसल्याची माहिती दिली. सावली तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून पाथरीची ओळख आहे. मात्र या गावातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उशिरा शाळेला पोहचतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांचे भविष्याचे काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्याध्यापक तसेच ९ शिक्षक उशिरा पोहचले. यामुळे तंमुस अध्यक्षांनी मुख्याध्यापकास उशिरा येण्याचे कारण विचारले. यावेळी त्यांनी शिक्षकांना सोमवारी सकाळ पाळीत शाळा ठेवली असल्याची माहिती शिक्षकांना देण्यात आली होती. मात्र शिक्षक उशिरा का आले याबाबत विचारणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तंमुस अध्यक्षा प्रफुल तुम्मे व पालकांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-24


Related Photos