पेट्रोल पंपावरील पैसे घेऊन पसार झालेल्या कामगारास एका महिन्यानंतर अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
स्थानिक पत्ता गोडावून जवळच्या सेवासिंग पेट्रोल पंपावर काम करणारा मजुर ६१ हजार रुपये घेऊन पसार झाला . याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच एक महिन्यानंतर त्या आरोपीला अटक करण्यात बल्लारपूर पोलिसांना यश आले . बबलू उमाकांत भूषणवार असे आरोपीचे नाव आहे . 
पेट्रोल पंपावरुण काम करणाऱ्या मजुराने ६१ हजार रुपये घेऊन पसार झाला . पेट्रोलपंप मालक याने सगळीकडे त्याचा शोध घेऊन अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . अखेर १ महिन्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध लावून त्याला नागपूर येथील गिट्टी खदान येथून अटक केली.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-24


Related Photos