रोहतक - रेवारी हायवेवर धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळल्या , ७ जण ठार


वृत्तसंस्था / रोहतक :  हरियाणात रोहतक-रेवारी हायवेवर धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये शाळेच्या बसचाही समावेश आहे. दिल्ली आणि हरियाणादरम्यान  हा अपघात झाला आहे.
हरियाणामधील जज्जर येथे अपघात झाला असून मृत झालेल्या सात जणांपैकी सहा महिला आहेत. अपघातात गाड्यांचा अक्षरक्ष: चुराडा झाला असून रस्त्यावर गाड्यांची रांग लागली होती. दुर्घेटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आले होते. अनेकजण कारमध्ये अडकले होते, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. अपघातानंतर दोन किमी लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.  हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक ठिकाणी दाट धुके पडले असून दृश्यमानता कमी झाली आहे. ५०० मीटरच्या अंतरावरही स्पष्ट दिसत नाही आहे.  Print


News - World | Posted : 2018-12-24


Related Photos