कोंढाळा येथील 'त्या' सार्वजनिक विहिरीची दुरुस्ती कोण करणार?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) :
२१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या  कार क्रमांक   एमएच ३३ ए   ५६३५ या कारने झालेल्या अपघातात कोंढाळा येथील सार्वजनिक विहीर खचली. तसेच कारमधील ऑइल विहिरीतील पाण्यात मिसळले. यामुळे पाणीसुद्धा दूषित झाले आहे. यामुळे आता या विहिरीची दुरुस्ती कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 
दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार   कोंढाळा येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीला आपटल्याने विहिरीचे कठडे हे पूर्णतः तुटले व कार ही विहिरीच्या टोकावर लटकल्याने कार मधील इंजिन आईल   पुर्णतः विहिरीच्या पाण्यात मिसळले.  यामुळे विहिरीतील पाणी पिण्यास  अयोग्य झाले  आहे. विहीर  बस स्थानकापासून काही अंतरावर असल्याने या विहिरीतील पाणी आजू बाजूचे लोक व ये-जा करणारे नागरिक वापरत होते.  मात्र कार मधील इंजिन आईल पाण्यात मिसळल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या विहिरीची दुरुस्ती कोण करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आजूबाजूला असलेल्या कुुुटुंबातील परिवारांना विचारणा केली असता,सार्वजनिक विहीर हीच एकमेव पिण्याच्या पाण्याचे साधन असल्याचे  त्यांचे म्हणणे आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-24


Related Photos