महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३ मार्च महत्वाच्या घटना

७८ : शालिवाहन शकास प्रारंभ झाला.

१८४५ : फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.

१८६५ : हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.

१८८५ : अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.

१९२३ : टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.

१९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.

१९३८ : सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.

१९३९ : महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.

१९४३ : दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.

१९६६ : डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.

१९७३ : भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.

१९८६ : ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.

१९९४ : जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.

२००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या शरच्‍चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.

२००५ : स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

२०१५ : २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

३ मार्च जन्म

१८३९ : टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)

१८४५ : जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)

१८४७ : टेलिफोनचा जनक ॲलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)

१९२० : किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.

१९२३ : इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.

१९२६ : संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०१२)

१९२८ : कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.

१९३९ : भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९९९)

१९५५ : विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२)

१९६७ : गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.

१९७० : पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांचा जन्म.

१९७७ : भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.

३ मार्च मृत्यू

१७०३ : इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १६३५)

१७०७ : सहावा मोघल सम्राट औरंगजेब यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)

१९१९ : कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)

१९२४ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.

१९६५ : पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.

१९६७ : माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.

१९८२ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)

१९९५ : तबलावादक पं. निखील घोष यांचे निधन.

२००० : मराठी चित्रपट अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos