महत्वाच्या बातम्या

 माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्यामुळे राजाराम परिसरातील शेतकर्‍यांचा धान खरेदी / विक्री केंद्राचा प्रश्न मार्गी लागला


- राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : राजाराम परिसरातील सुमारे १५ गावांना धान विक्रीसाठी दुरवरच्या कमलापूर येथील केंद्रावर जावे लागत असते त्यामुळे गरीब शेतकर्‍यांना खुप अडचणी येतात. खुप वर्षांपासुन राजाराम येथे धान खरेदी केंद्राची मागणी प्रलंबीत होती. बर्‍याच तांत्रीक बाबींच्या मुद्द्यावर मागणी पुर्ण होत नव्हती परंतु राजे अम्ब्रीशराव महाराजांनी पालकमंत्री असतांना जोर लावुन धान खरेदी केंद्राला मंजुरी मिळवुन दिली.

महसुल आणि वनविभागाकडे सोयीची जागा ऊपलब्ध नसल्याने पुन्हा जागेचा प्रश्न ऊभा ठाकला. गावकर्‍यांनी एकत्र येवुन पुढाकार घेतला व एक मोक्यावरची खाजगी जागा खरेदी करुन धान खरेदी केंद्रासाठी शासनाला ऊपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. परंतु समस्या सुटण्याचे नावच घेईना. जमिन मालकाला पैशाची तातडीची गरज भासली आणि गावकर्‍यांकडे पुरेशी रक्कम जमा झाली नव्हती त्यामुळे जमिनीचा व्यवहार फिसकटण्याची स्थिती निर्माण झाली. कमी वेळात मोठी रक्कम गोळा करणे परिसरातील शेतकर्‍यांसाठी अशक्यप्राय होते. शेवटी सरपंच आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी मदतीसाठी राजे साहेबांकडे धाव घेतली. राजे साहेबांनी समस्येचे गांभीर्य ओळखुन सढळ हस्ताने आर्थीक हातभार दिला त्यामुळे धान खरेदी केंद्रासाठी मोठ अडसर दुर झाला. राजाराम ग्रा.पं.क्षेत्रातील राजाराम, सुरायपल्ली,कोंकापार व खांदला ग्रा.पं. क्षेत्रातील खांदला,पत्तीगाव,कोत्तागुडम, चिरेपल्ली,मरनेली,रायगट्टा,गोल्लाकर्जी आणि तिमरम ग्राम पंचायत क्षेत्रातील तिमरम, गुड्डीगुडम,निम्मलगुडम इत्यादी गावांना धान खरेदी केंद्राचा लाभ होईल.

यापुर्वीही पालकमंत्री असतांना राजे साहेबांनी यापरिसरात रस्त्यांचे जाळे विणले, पुल बांधुन शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवला. आता धान खरेदी केंद्राच्या सर्व समस्या मार्गी लावून शेतकर्‍यांचे खरे कैवारी बनले.

यावेळी रविंद्र पंजलवार, मनोज सिडाम, वसंत सिडाम, संतोष तोर्रेम, धर्मा आत्राम, शंकर सिडाम, वसंत तोर्रेम, महेश सिडाम, महादेव आलाम, नागेश कन्नके सरपंच, भास्कर तलांडे माजी सभापती पं. स.अहेरी, विनायक आलाम माजी सरपंच, नारायण कंबागोनिवार ग्रा.प.सदस्य, मलय्या तोर्रेम, दीपक अर्का, मुत्ता पोरतेट, राकेश तलांडे, मोहन वेलादी, संजय पोरतेट, तिरुपती कुळमेथे, सुखदेव आत्राम, विलास करपेत यांच्यासह गावकरी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos