महत्वाच्या बातम्या

 आंतर इंडियन क्रिकेट क्लब सीजन २ ला १४ एप्रिल पासून होणार सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : इंडियन क्रिकेट क्लब गडचिरोली येथील आंतर इंडियन क्रिकेट क्लब स्पर्धेला 14 एप्रिल 2023 पासून सुरुवात होणार आहे.

इंडियन क्रिकेट क्लब ची स्थापना 2014 वर्षी झाली आणि नियमित जिल्हा परिषद मैदानावर तिन्ही ऋतू मध्ये या धकधकीच्या जीवनात व्यस्त असतांना सुद्धा इंडियन क्रिकेट क्लब चे खेळाडू नियमित क्रिकेट खेळत असतात.

जवळपास 150 पेक्षा जास्त खेळाडू संख्या असलेला इंडियन क्रिकेट क्लब गडचिरोली हा मोठा क्रिकेट क्लब आहे. ज्यात प्रामुख्याने वरीष्ठ क्लासवन अधिकाऱ्यांपासून जास्तीत जास्त कर्मचारी आहेत.

इंडियन क्रिकेट क्लब चे एकूण 8 संघ पडण्यात आले असून आंतर इंडियन क्रिकेट क्लब स्पर्धेला इंडियन प्रीमियर लीग स्पर्धे च्या पार्श्वभूमीवर सुरुवात करण्यात येणार आहे.

सदर स्पर्धा 3 दिवस चालणार असून भव्य स्पर्धेचे आयोजन इंडियन क्रिकेट क्लब करीत आहे.

आजची पिढी मोबाईल फोन वर व्यस्त आहे.  मैदानी खेळ खेळत नाहीत, सर्वांना मैदानी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी इंडियन क्रिकेट क्लब आंतर इंडियन क्रिकेट क्लब स्पर्धेचे आयोजन करीत आहे.

स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी सन्मानीय प्रणील गिल्डा साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय महेश देशमुख करणार आहेत. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos