प्रवास आणि झोपेच्या कमतरतेने विद्यार्थ्यांना पित्त आणि इतर त्रास : प्रकल्प अधिकारी


-  अन्नाचे नमुने  अन्न व औषध विभागाला पाठवले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  भंडारा :
आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता विद्यार्थ्यांची प्रकृती  स्थिर आहे. प्रवास आणि झोपेच्या कमतरतेने विद्यार्थ्यांना  पित्त आणि इतर त्रास झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती  प्रकल्प अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. 
  सद्यस्थितीत  विद्यार्थीं हॉस्पिटलकडे येण्याचे प्रमाण नाही. दक्षता म्हणुन FDA आणि आरोग्य विभागाकडे अन्नाच्या तपासणीसाठी नमुने  देण्यात आलेले आहे. अशी माहिती प्रकल्प अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. 
नागपुर विभागातील आदिवासी विकास विकागाच्या ८ प्रकल्पातील जवळपास २ हजार ७०० मुले  आणि ४०० कर्मचारी  भंडारा येथे काल दाखल झाले. यात चंद्रपुर, गडचिरोली, देवरी, चिमुर इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे. हे विद्यार्थी पहाटेपासून बसने  प्रवास करुन भंडारा येथे आले होते. काही प्रकल्पांनी सकाळी पहाटे ४ वाजतापासून प्रवास केला होता.
  त्यांनतर दुपारचे भोजन सर्वांनी भंडारा जिल्हा क्रीडा संकुल येथे केले. नंतर मैदानात ते सराव करु लागले.  सरावानंतर व उद्घाटनानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ जाणवु लागली आणि जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची  चमु क्रीडा संकुल येथे उपस्थित होती. प्रकल्प कार्यालयातील आरोग्य समितीतील कर्मचाऱ्यांनी  दक्षमा म्हणुन डोके - दुखी, मळमळ असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेण्याची व्यवस्था केली. जिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांना नेऊन तेथे त्यांची प्राथमिक तपासणी केली. तपासणीनंतर बारा विद्यार्थी आणि दोन शिक्षक यांना  निरीक्षणाखाली जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. इतर विद्यार्थ्यांना किरकोळ लक्षणे असल्यामुळे त्यांना तपासणी करुन सोडण्यात आले.
बारा विद्यार्थ्यांपैकी दोन  विद्यार्थ्यांना Loose Motion  असुन सात विद्यार्थ्यांना उलटी एक  किंवा दोन वेळा झाली. सद्यस्थितीत बारा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.    Print


News - Bhandara | Posted : 2018-12-23


Related Photos