महत्वाच्या बातम्या

 शेतक-यांच्या परंपरेला कायम ठेवण्यासाठी शंकरपटाचे आयोजन आवश्यक : आ.विनोद अग्रवाल


- आमदार क्रीडा महोत्सव द्वारे आयोजित भव्य शंकरपट मध्ये आ.विनोद अग्रवाल यांनी दर्ज केली उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया तालुक्यातील तांडा अदासी च्या परिसरामध्ये आमदार क्रीडा महोत्सव द्वारे आयोजित भव्य शंकरपट चे आयोजन शंकरपट समिती तांडा-अदासी द्वारे आयोजित करण्यात आले होते. त्या निमित्त आ.विनोद अग्रवाल यांनी आपली उपस्थिति दर्ज केली व या निमित्त त्यांनी शेतक-यांना प्रोत्साहन देता बोलले की शंकर पट म्हणजे बळीराजा चा हा खेळ नाही तर एक शेतकऱ्याची परंपरा आहे. तसेच शेतक-यांच्या या परंपरेला कायम ठेवण्यासाठी अश्या प्रकाराचे आयोजन केले पाहिजे जेणेकरून ही परंपरा कायम ठेवता येईल या खेळाला बैलगाडा शर्यत असे ही संबोधले जाते आणि नियम पण वेगवेगळे असतात त्या नियमाचे पालन केले पाहिजे अश्या शब्दाने शेतक-यांना थोडक्यात मार्गदर्शन केले.

मोठ्या संख्येने या शंकरपट मध्ये शेतक-यांनी बैलाची जोड़ी स्पर्धेकरीता जोड़ी आणली होती. व मोठा उत्साह शेतक-यांमध्ये होता. तसेच या शंकरपट मध्ये बैलांची शर्यत पाहण्यासाठी शेतक-यांची मोठी गर्दी होती व जिंकलेल्या बैलांची जोड्याकरीता इनामी सुद्धा ठेवण्यात आली आहे. त्यात पहला इनाम म्हणून ३१ हजार दुसरा इनाम २१ हजार, तृतीय इनाम १३ हजार, चतुर्थ इनाम ११ हजार, पांचवे इनाम १० हजार, सहावे इनाम ९ हजार अश्या प्रकारे एकून १५ इनामी ठेवण्यात आली असून हरलेली जोड्याना इतर प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर शंकरपट मध्ये तक्रार फी तसेच इंट्री फी सुद्धा ठेवण्यात आली आहे. पटाचे आयोजन शासनाच्या नियमाच्या अधीनस्थ राहून करण्यात आले आहे.

या दरम्यान आ.विनोद अग्रवाल, जेकीपी अध्यक्ष भाउराव उके, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन गौतम, सभापती मुनेश रहांगडाले, ओमेश बाबा चौधरी, बालू बिसेन, विक्की बघेले, माधोराव रहांगडाले, चेतसिंह परिहार, लिनेश रहांगडाले, गणेश रहांगडाले, रामेश्वर भगत, तीरथ चौहान, सूर्यकिरण पटले, दिनेश सुरसाउत व इत्यादी शेतकरी व आयोजक या दरम्यान उपस्थित होते.  





  Print






News - Gondia




Related Photos