महत्वाच्या बातम्या

 अहेरी येथील क्रीडापटू आजारी नागु कोडापेला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी येथील नेहमी क्रीडा क्षेत्रात चर्चेत असणारी नागू कोडापे ही गेल्या १० दिवसापासून लूपस या आजारामुळे चंद्रपूर येथील यशोदा अँड हेल्थकेअर येथे ऍडमिट होती. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने नागू कोडापेला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. नागपूर येथील प्रसिद्ध असलेला क्रीम्स हॉस्पिटलचा आयसीयू मध्ये नागु कोडापेला भरती करण्यात आले.

पुढील उपचाराकरिता घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याची माहिती मिळताच लगेच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तातडीने १५ हजार रुपयांची आर्थिक मदत केले. तसेच डॉक्टरांशी बोलून नागपुरात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे, यासाठी राजेंनी प्रयत्न केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos