महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यात कामगारांचे १०० बेडचे हॉस्पिटल होणार : केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली


- असंघटित कामगार मेळावा व जेष्ठ कामगार सत्कार सोहळा तसेच आरोग्य शिबीर संपन्न.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : खासदार रामदास तडस यांच्या मागणीनुसार वर्धा जिल्ह्यत १०० बेडचे हॉस्पिटल तयार करून असंघटित कामगारांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम व कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी भाषणात दिले. याशिवाय कामगारांसाठी ईपीएस ९५ योजना विचाराधीन आहे. सोबतच केंद्र शासनाकडे कामगारांच्या हितासाठी असलेल्या जमा राशीतून त्यांच्या बँक खात्यात पेन्शन म्हणून पैसे वळते करण्याबाबत गाईड लाइन तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिले. देशात  तीन करोड ई कार्ड बनविण्याचे लक्ष्य असून यातुन कामगारांना सवलती देण्याचे तसेच त्याचे स्वास्थ्य, शिक्षण व रोजगारासाठी काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या जडणघडणीत  कामगारांचे मोठे योगदान असतांना त्यांचा प्रमाणित डाटा उपलब्ध होत नसल्याने काही लोकप्रिय योजना राबविण्यास अडचण होत असल्याचे शल्य त्यांनी बोलून दाखविले. खासदार तडस यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून देवळीत आयोजित कामगार मेळावा तसेच जेष्ठ कामगार सत्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती होते. अतिथी म्हणून भाजपचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, आमदार अशोक उईके, आमदार प्रताप अडसड,  भाजपचे प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट, भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष मिलिंद देशपांडे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होते.

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी वर्धा जिल्हा व स्वाभिमानी बांधकाम संघटनेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षीय भाषणात खासदार तडस यांनी असंघटित कामगारांच्या व्यथा व्यक्त करून त्यांच्यासाठी ईपीएस ९५ पेन्शन योजनेची मागणी लावून धरली. सोबतच त्यांच्या राहत्या घराची तसेच आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी केली. खेलो इंडिया मध्ये कुस्ती खेळाचा समावेश करून कोचिंग कॅम्प देण्याबाबतचा पाठपुरावा करण्याची विनंती राज्यमंत्री तेली यांच्याकडे करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समोयोचीत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी केले. संचालन राहुल चोपडा व आभार प्रदर्शन दशरथ भुजाडे यांनी केले. यावेळी जेष्ठ कामगार मारोती मुडाळ, दिलीप कोरे, नरेंद्र मानकर, आशा सोमकुवर, देविदास सूर्यवंशी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, कामगारांना ई-कार्ड व अनुदान वाटप करण्यात आले, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे वतीने खासदार तडस यांचा शाल, श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष शोभा तडस, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे,  माजी नगराध्यक्ष सुचिता मडावी, माजी जीप अध्यक्ष नाना ढगे, भाजपच्या महिला आघाडी अध्यक्ष वैशाली येरावर, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष अभय नागरे, माजी नप उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नंदू वैद्य, मिलिंद भेंडे, माजी पस सभापती विद्या भुजाडे, कल्पना ढोक, मारोती मरघाडे, जयंत येरावार, मिलिंद ठाकरे, सारिका लाकडे, सुनीता बकाने, दिलीप कारोटकर, नितीन बडगे, प्रशांत बुरले, वामन रघाटाटे, एस राहुल, विजय गोमासे, पुंडलिक पांडे, राजू इंगोले, रवी कारोटकर, उमेश कामडी, सौरभ कडू, मयुरी मसराम, शुभांगी कुर्जेकर, ज्योती खाडे, गजू राजूरकर, दीपक फुलकरी, गजानन हिवरकर, अंकीत टेकाडे, सुनिल पिसुड्डे, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी, स्वाभीमानी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच असंघटित महिला व पुरुष कामगारांची उपस्थिती होती.





  Print






News - Wardha




Related Photos