विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी आश्रमशाळेच्या १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
येथे सुरु असलेल्या आश्रमशाळेच्या विभागीय क्रीडा स्पर्धेदरम्यान दिलेल्या मध्यान्ह भोजनातून  भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  
१७४ पैकी १५५ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले आहे. तर १९ जणांवर अजूनही जिल्हा सामान्य रुग्णालयात  उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शनिवारी दुपारच्या जेवणानंतर बहुतांश जणांना मळमळ वाटणे, डोकेदुखी व उलट्या होण्याचा त्रास व्हायला सुरूवात झाली. त्यानंतर त्रास होणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले . रात्री उशिरापर्यंत अस्वस्थ वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्याचे कार्य सुरु होते. सदर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी दोन हजार ७०० मुलांसह ३०० शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे. 
विषबाधा अन्नातून व पाण्यातून झाल्याचे रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे म्हणणे आहे.    Print


News - Bhandara | Posted : 2018-12-23


Related Photos