महत्वाच्या बातम्या

 राहुल गांधी समर्थनात बल्लारपुर युवक काँग्रेस व एन.एस.यु.आय. ने केले सत्याग्रह आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लरपुर : राहुल गांधी समर्थनात बल्लारपुर युवक काँग्रेस व एन.एस.यु.आय. ने गांधी चौक मध्ये सत्याग्रह आंदोलन केले.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेने मोदी सरकार धास्तावले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. २०२४ च्या पराभवाच्या भीतीतून खासदारचे पद रद्द करण्याची कारवाई मोदी सरकारने केली आहे. देशात हुकमशाहीची ही सुरुवात आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनात पूर्व सांसद नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवक काँग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात प्रदेश युवक कांग्रेस व बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस  तर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शहरातील गांधी चौकात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. 

यावेळी पूर्व नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, माजी नगराध्यक्ष छाया मड़ावी, पूर्व न.प.गट नेता देवेन्द्र आर्य, पूर्व नगर सेवक भास्कर माकोड़े, सेवादल अध्यक्ष प्राणेश अमराज, एन.एस.यु.आय. जिल्हा अध्यक्ष शफाक शेख, पूर्व नगर सेवक विनोद आत्राम, युवक कांग्रेस अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, युवक कांग्रेस जिल्हा महासचिव शंकर महाकाली, दानिश शेख, अरविंद वर्मा, अजय रेड्डी, संदीप नाक्षिणे, अकरम शेख, सुनील मोतीलाल, संजु सुददला, अमोल झामरे, गोपाल कलवला, रोशन ढेगड़े, तिरुपति दासरी, दीपक झिलाला, तपन उगले, राहुल रामटेके, रवि चौहान, राहुल रामटेके, मोहंमद सिराज, मोहित घोरगाटे, एल्कापेली प्रशांत, दरपाली राजू, पोगुला अजय, शुभाष केसकर, राजू घुगरे, सिंगारप जीतू यांच्या उपस्थित होते.

पूर्व नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी म्हणाले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदार की रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाने घेतला आहे. राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, न्यायालयाने ३० दिवसांचा अवधी देऊन देखील, आता राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालया कडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशात भारत जोडो यात्रा काढली. यात्रेदरम्यान समाजातील सर्व घटकांशी संवाद साधत दुख समजून घेतले. यात्रेला देशात अभूतपूर्व  प्रतिसाद मिळाला. केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा आवाज दाबण्यासाठी राहुल गांधी यांचे खासदारपदच रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सुडबुद्धीने घेण्यात आला असून, केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात युवक काँग्रेस आता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम  यांनी दिला आहे.

आंदोलनात काँग्रेस व युवक कांग्रेस, एन.एस.यु.आय., सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos