महत्वाच्या बातम्या

 शिवणी येथे राम नवमी निमित्य रक्तदान शिबिर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : श्री गुरुदेव व्यायाम शाळा शिवनी यांच्या तर्फे राम नवमी निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात एकूण 23 रक्तदात्यांनी रक्तदान केले. राम जन्मोत्सव निमित्याने शिवनी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला प्रामुख्याने रमाकांत लोधे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर, पांडुरंग बोरकर उपसरपंच शिवनी , राज पाकेवार रोजगार सेवक , मंगेश मेश्राम ग्राम पंचायत सदस्य रत्नापुर, मंडळाचे अध्यक्ष चेतन ठीकरे, सचिव विशाल हजारे उपस्थित होते.

वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही. रक्तदाना सारखे श्रेष्ठ दान कोणतेही नाही. निरोगी व्यक्तीद्वारे केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केले जाते. त्यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते. रक्तदान हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान हे निःस्वार्थ भावनेने केले पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळणार आहे. यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे कर्मचारी श्री. गुरुदेव व्यायाम शाळेतील सदस्य गण यांच्या उपस्थितीत सहकार्याने पार पडले.





  Print






News - Chandrapur




Related Photos