महत्वाच्या बातम्या

  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबळीकरण विभागाकडून राबविण्यात येणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी सन 2022-23 मधील दिव्यांग शिष्यवृत्तीचे डीबीटी पोर्टल प्रणाली कार्यान्वित आहे. यासाठी आपल्या लॉगिनवरुन प्राप्त दिव्यांग मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज विहित वेळेत तपासून तात्काळ जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर 31 ऑक्टोंबर पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांनी शालांतपुर्व शिष्यवृत्ती  योजनेचे अर्ज www.scholarship.gov.in या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर कार्यालयाच्या लॉगिनवर अर्ज करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या 07152-242783 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.





  Print






News - Wardha




Related Photos