महत्वाच्या बातम्या

 हाजी दादा हासम चिनी अँड सन्स वर कारवाई : १ हजार ३२५ किलो प्लास्टीक जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भानापेठ येथील हाजी दादा हासम चिनी अँड सन्स या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून १ हजार ३२५ किलो प्लास्टीक जप्त केले आहे. शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदारा कडुन ५००० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे.

पुन्हा सदर गुन्हा केल्यास मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. शहरात अजुनही वस्तू खरेदी करतांना प्लास्टिकची पिशवी देण्यात येते किंवा मागितली जाते. प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणुन मनपामार्फत विकल्प थैला नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत ७२३ दुकानदारांनी विकल्प थैलाच्या वापरास सुरवात केली असुन मनपाद्वारे ३३०५७ कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे.

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके, भुपेश गोठे, मनीष शुक्ला, राज हजारे, अतिक्रमण पथक व स्वच्छता विभागातर्फे करण्यात आली.





  Print






News - Chandrapur




Related Photos