महत्वाच्या बातम्या

 जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल उभारण्याकरिता नागपूर विद्यापीठाला २० कोटींचा निधी वितरित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठात जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल उभारण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून २० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

याबाबत महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता आंतर क्रीडा संकुल लवकरच साकारण्यास सुरुवात होणार आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग वाढवा म्हणून शाळा व इतर संस्था, व्यक्ती यांना सुद्धा संकुलाचा लाभ व्हावा या दृष्टीने जागतिक दर्जाचे आंतरक्रीडा संकुलाचे बांधकाम प्रस्तावित केले आहे. या क्रीडा संकुलासाठी ४४.४१ कोटी रुपये इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास १३ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशासकीय मान्यतेस अनुसरून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आंतर क्रीडा संकुलामुळे नागपूर शहरच नव्हे तर मध्य भारतातील खेळाडूंकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान सरावा करिता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यापीठासह येथील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुलाचा लाभ घेता येणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ ला झाली. विद्यापीठाचा परिसर ३७३ एकर मध्ये पसरला आहे. मध्य भारतातील सर्वात जुनी विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या विद्यापीठाने शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यामुळे २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने विद्यापीठाच्या अंगीकृत ज्ञान निर्मिती आणि कौशल्य निर्मिती बरोबरच परिक्षेत्रातील जनसमुहाच्या भौतिक गरजा लक्षात घेतल्या आहे. त्याबरोबर भविष्यातील विकासाच्या शक्यतांचा वेध घेऊन काही नवीन प्रकल्पाची उभारणी करण्यास विद्यापीठाने सुरुवात केली. याकरिता हा निधी उपलब्ध झाला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos