अवनी च्या एका बछड्याची रवानगी गोरेवाडात, दुसऱ्या बछड्याचा वनविभागाकडून शोध सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  ठार करण्यात आलेल्या अवनी या वाघिणीच्या   दोनपैकी एका बछड्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे. सी१ आणि सी २ अशी या दोन बछड्यांची नावं असून त्यातील मादी बछड्याला यवतमाळच्या जंगलातून जेरबंद करण्यात आलं. या बछड्याची रवानगी नागपूरच्या गोरेवाडाला करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  तर दुसऱ्या बछड्याचा शोध वनविभागाकडून सुरु आहे असेही समजते आहे.
अवनी या टी १ वाघिणीची नोव्हेंबर महिन्यात शिकार करण्यात आली होती. या शिकारीनंतर देशात आणि राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. या वाघिणीच्या शिकारीनंतर तिच्या दोन बछड्यांचे काय? असा प्रश्न विचारला जात होता त्यापैकी एका बछड्याला वनविभागाने जेरबंद केले आहे.  अवनी वाघिणीच्या या दोन बछड्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. कान्हा अभयारण्यातील शिवा, चंचलकली, हिमालय आणि पवनपुत्र या हत्तींना आणले गेले होते. या पथकासोबत पशुवैद्यकीय अधिकारीही सहभागी झाले होते.  दरम्यान अंजी परिसरात वनाधिकारी आणि कर्मचारी यांना वगळता कोणालाही जाण्याच मज्जाव करण्यात आला. अखेर या मोहिमेला यश मिळालं असून एका बछड्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2018-12-23


Related Photos