महत्वाच्या बातम्या

 नगरपरिषद व नगरपंचायतींना ११ कोटी १७ लक्ष रुपये मूलभूत अनुदानाचा पहिला हप्ता वितरित : खासदार रामदास तडस


- महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाच्या वतीने शासन निर्णय ३० मार्च २०२३ ला प्रसिध्द.

- केन्द्र शासनाचे पत्र २९ मार्च २०२३ नुसार निधी प्राप्त.  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील मुलभूत अनुदानाचा पहिला हप्ता राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३० मार्च २०२३ ला वितरीत केला आहे. शहरातील विकासकामांसाठी तसेच नव्याने विस्तारलेल्या भागात नागरी सुविधांसाठी वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा, देवळी, पुलगांव, आर्वी, हिंगणघाट, सिंदी रेल्वे, नगर पंचायत सेलू, समुद्रपूर, आष्टी कारंजा, तसेच अमरावती जिल्हयातील नगर परिषद धामणगांव, वरुड, मोर्शी, शेंर्दुजनाघाट, चांदूर रेल्वे, नगर पंचायत नांदगांव खंडेश्वर करिता विकास निधी उपलब्ध झालेला आहे. केन्द्रशासनाचे पत्र २९ मार्च २०२३ नुसार व महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाच्या वतीने ३० मार्च २०२३ ला प्रसिध्द झालेल्या शासन निर्णय नुसार मुलभुत अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिले.

१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार प्राप्त झालेल्या मुलभूत अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत केला असुन यामध्ये वर्धा नगर परिषदेला - २ कोटी १५ लाख ९४ हजार १६६ रुपये, आर्वी  नगर परिषदेला - ८८ लाख १ हजार १५९ रुपये, हिंगणघाट नगर परिषदेला - २ कोटी ७ लाख ३४ हजार ८२४ रुपये, पुलगांव नगर परिषेदला - ६८ लाख १९ हजार ७४८ रुपये, देवळी नगर परिषदेला - ३८ लाख ७१ हजार १४२ रुपये, सिंदी रेल्वे नगर परिषदेला - २९ लाख २६ हजार ८९ रुपये, सेलू नगर पंचायतला - २७ लाख ५२ हजार २३६ रुपये, समुद्रपूर नगर पंचायतला - १५ लाख ४२ हजार १०२ रुपये, आष्टी नगरपंचायतला २३ लाख २५ हजार ५१६ रुपये, कारंजा नगर पंचायतला - २६ लाख ८ हजार ४८१ रुपये तसेच अमरावती जिल्हयातील धामणगांव नगर परिषदेला - ४३ लाख २२ हजार ७७९ रुपये, वरुड नगर परिषदेला - १ कोटी ११ लाख ६६ हजार २ रुपये, मोर्शी नगर परिषदेला - ८३ लाख ३३ हजार ४६७ रुपये, शेंर्दुजनाघाट नगर परिषदेला - ५३ लाख ६६ हजार ४६७ रुपये, चांदूर रेल्व नगर परिषदेला - ४० लाख ३० हजार ९७८ रुपये नांदगांव खंडेश्वर नगर पंचायतला  - ४५ लाख ८९ हजार ४२६ रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

नगर परिषदेला १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट नगर परिषेदला प्राप्त निधीमुळे शहरातील रस्ते तसेच अन्य विकासकामांना गती मिळणार गती मिळणार असुन १५ व्या वित आयोग अंतर्गत विकास कामांना प्राधान्याने पुर्ण करण्यात येणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos