महत्वाच्या बातम्या

 मध केंद्र योजनेअंतर्गत मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोली अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये मधपाळ प्रशिक्षण मौज कुमरगुडा ता. भामरागड जिल्हा गडचिरोली येथे १० लाभार्थीस १० दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. सदरचे प्रशिक्षण १५ मार्च २०२३ ते २४ मार्च २०२३ पर्यंत घेण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाला संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, भामरागड स्वप्नील मगदूम. तहसीलदार, भामरागड कांबळे तसेच जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली भास्कर मेश्राम, मधमाशा पालन प्रशिक्षक दत्तु येरगुडे इत्यादी प्रमुख अथिती उपस्थित होते. 

यावेळी संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांनी अतिदुर्गम भागात कशाप्रकारे उद्योगाला चालना मिळेल या बद्दल सांगितले व कांबळे तहसीलदार यांनी मधमाश्या पालनाचे फायदे व त्यापासून निर्माण होणारे रोजगार यांची माहिती दिले. भास्कर मेश्राम जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी मंडळाचे विविध योजनाबद्दल माहिती दिले व प्रशिक्षक दत्तु येरगुडे यांनी मधमाशा पालणा बद्दल माहिती दिले. 

तसेच यावेळी खादी ग्रामोद्योग मंडळाचे इतर कर्मचारी लखन गेडाम, शैलेश गोतमारे व हर्षल हुमणे उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos