महत्वाच्या बातम्या

 दोन वाहनांचा अपघात पाच जण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वरोरा : चंद्रपूर महामार्गावरील येसा गावा जवळ झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात एका लहान मुलासह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारला सायंकाळी ०६:०० वाजताच्या दरम्यान घडली. माहितीनुसार नागपूर वरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रक क्रमांक (एम एच ३४-AV-८८८९) या वाहनाचा टायर फुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे असताना मागून भरधाव येणाऱ्या इनोवा क्रमांक (एम एच ३४-BV-१९८०) या क्रमांकाच्या गाडीने मालवाहू गाडीला मागवून धडक दिली.

यामध्ये कमलेश राम (38), श्रेयस राम (8), जिजा प्रसाद (30), सुनंदा राठोड (54) आणि शेरसिंग थापा (52) सर्व राहणार चंद्रपूर येथील असून सदर घटनेत जखमी झाले. असून श्रेयस आणि जिजा प्रसाद यांना गंभीर दुखापत झाली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर सर्व जखमींना चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos