माेबाईलमध्ये ३५ रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य, अन्यथा आऊटगाेईंग सेवा होणार बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
अनेकजण वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम कार्ड वापरतात. मात्र बॅलेन्स ठेवत नाहीत. मात्र आता माेबाईलमध्ये ३५ रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य झाले आहे. अन्यथा तुमची आऊटगाेईंग सेवा बंद हाेऊ शकते तसेच सिमकार्डही काही दिवसात बंद हाेऊ शकते अशी माहिती प्राप्त झाली आहे.   आयडीया आणि व्हाेडाफाेन कंपनीतील सूत्रांच्यानुसार या कंपन्यांनी नवीन नियम तयार केला असून त्याअंतर्गत आता ग्राहकांना सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी किमान ३५ रुपये बॅलन्स फाेनमध्ये ठेवावा लागणार आहे. 
 गेल्या अनेक दिवसांपासून काही प्रतिष्ठीत कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये अनेक अडचणी येत आहेत. काॅल ड्राॅप हाेणे, फाेरजी रिचार्ज केलेले असताना फाेरजीचा स्पीड न मिळणे, अनेक ठिकाणी नेटवर्क नसणे अशा असंख्य समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांना आपल्या फाेनमध्ये दाेन सिमकार्डचा वापर करावा लागत आहे. जिओ कंपनीचे इंटरनेट वापरण्यावर अनेक नागरिकांचा कल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयडीया, व्हाेडाफाेन, ऐअरटेल या कंपनीच्या ग्राहकांना किमान ३५ रुपयांचे रिचार्ज करा अन्यथा तुमची सेवा खंडीत हाेईल असा मेसेज कंपनीकडून केला जात आहे. अनेकांचे सिमकार्ड बंद देखील करण्यात आले आहे. यामुळे आधीच त्रस्त असलेले ग्राहक सिम बंद हाेत असल्याने अधिक त्रस्त हाेत आहेत. 
   Print


News - World | Posted : 2018-12-22


Related Photos