लोकबिरादरी प्रकल्पाचा उद्या ४५ वा वर्धापन दिन, विविध कार्यक्रमांची राहणार रेलचेल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड  :
श्रद्धेय बाबा आमटे यांच्या कल्पनेतून साकारलेले व जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे- डॉ. सौ.मंदाकिनी आमटे या उभयतांची कर्मभूमी प्रसिद्ध समाजसेवा केंद्र   लोकबिरादरी प्रकल्पाला उद्या  २३ डिसेंबर  रोजी   ४५ वर्षे पूर्ण होत आहे. हा प्रकल्प ४६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांनी लोकबिरादरी प्रकल्पाचा ४५ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून लोकबिरादरी आश्रम शाळेचे  स्नेहसम्मेलन २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर  पर्यंत चालणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांतर्फे विविध उपक्रमांचे सादरीकरण,क्रीडा स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळ, शैक्षणिक गमंत जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादीं मनोरंजनाची मेजवाणी मिळणार आहे.
 उद्या २३ रोजी  डिसेंबर सकाळी लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापन दिन सोहळा व शालेय स्नेहसंम्मेलनाचे उद्घाटन होईल. दुपारी रांगोळी स्पर्धा, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चर्चासत्र. सांयंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम.२४ व २५ डिसेंबर ला क्रीडा स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळ व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम.२६ डिसेंबरला आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गंमत जत्रा,त्यानंतर बक्षीस वितरण व समारोपिय कार्यक्रम होणार आहे. 
 २३ डिसेंबर रोजी लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापन दिन, २४ डिसेंबर रोजी डॉ. प्रकाश - डॉ.  मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचा वाढदिवस, २५ डिसेंबर रोजी  डॉ.  मंदाकिनी आमटे यांचा वाढदिवस , २६ डिसेंबर रोजी डॉ. प्रकाश आमटे यांचा वाढदिवस तथा श्रद्धेय बाबा आमटे यांची जयंती. असे सलग चार दिवस आमटे कुटुंबीयांचे वाढदिवस येत असल्याने चाहत्यासाठी शुभेच्छा देण्याकरिता ही आनंदाची पर्वणीच आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-22


Related Photos