आजचे दिनविशेष
१ एप्रिल महत्वाच्या घटना
१६६९ : उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.
१८८७ : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१८९५ : भारतीय लष्कर स्थापन झाले.
१९२४ : रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले,
१९२८ : पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.
१९३३ : भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कटाची येथे उड्डाण.
१९३५ : भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
१९३६ : ओटिसा राज्याची स्थापना झाली.
१९३७ : रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.
१९५५ : गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
१९५७ : भारतात दशमान पद्धतीचा वापट सुरू झाला.
१९७३ : कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली.
१९७६ : ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.
१९९० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान.
२००४ : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
१ एप्रिल जन्म
१५८७ : मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हाव यांचा जन्म. (मृत्यू : ३ जून १६५७)
१६२१ : शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू : २४ नोव्हेंबर १६७५)
१८१५ : जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू : ३० जुलै १९८९)
१८८९ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू : २१ जून १९४०)
१९०७ : भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.
१९१२ : हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू : २६ सप्टेंबर १९८८)
१९३६ : आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.
१९४१ : भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.
१ एप्रिल मृत्यू
१९८४ : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म : ४ एप्रिल १९०२-कोल्हापूर, महाराष्ट्र)
१९८९ : समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन. (जन्म : १२ नोव्हेंबर १९०४)
१९९९ : भारतीय टपाल खात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन,
२००० : कवयित्री संजीवनी मराठे याचे निधन. (जन्म : १४ फेब्रुवारी १९१६)
२००३ : गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.
२००६ : बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर याचं निधन. (जन्म : ११ डिसेंबर १९२५)
२०१२ : भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे याचं निधन. (जन्म : २८ मार्च १९२१)
News - todayspecialdays