महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यात २ हजार ६८८ शेतकऱ्यांना तुषार सिंचनचा लाभ


-  125 गावात कृषी संजीवनी प्रकल्प

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्यासोबतच किफायतशीर शेती व्यवसायास सहाय्य करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 2 हजार 688 शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यासाठी 4 कोटी 76 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ त्यांना देण्यात आला आहे.  राज्यात 15 जिल्ह्यातील 5 हजार 142 गावांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. हवामान बदलास असुरक्षितता, संवेदनशीलता आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यांच्या एकत्रित निर्देशांका नुसार गाव समूह निश्चित करण्यात आले तसेच लघुपाट बंधाराचे सरासरी क्षेत्र सुमारे 5 हजार हेक्टर एवढे असून यामध्ये सरासरी सात ते आठ गावांचा समावेश आहे.

प्रकल्पाच्या उद्देशाप्रमाणे जिल्ह्यातील निवडलेल्या 125 गावांमध्ये शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. तसेच या शेती शाळेद्वारे संबंधित गावातील शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञान, जसे की रुंद सरी वरंबा तसेच शून्य मशागत इत्यादी सारखे हवामान अनुकूल तंत्रज्ञान शिकवण्यात आले आहे. या हवामान अनुकूल तंत्रज्ञांचा वापर करण्यासाठी वैयक्तिक लाभाअंतर्गत ठिबक, तुषार, पॉलिहाऊस, शेततळे, वृक्ष लागवड, रेशीम उद्योग, शेततळे, वृक्ष लागवड, फळबाग, विहीर पुनर्भरण, नाडेफ, शेडनेट, बिजोत्पादन अशा प्रकारच्या वैयक्तिक योजनांवर साठ ते शंभर टक्केपर्यंत अनुदान देण्यात येते. 

काढणी पश्चात व्यवस्थापन या घटकांतर्गत महिला बचत गट, शेतकरी बचत गट तसेच उत्पादक कंपनी यांना शेतीवर आधारित व्यवसायासाठी 60 टक्के अनुदान दिले जाते. सामूहिक लाभांतर्गत जुन्या मृदा जलसंधारणाची कामे शंभर टक्के अनुदानावर करण्यात येत आहे. मार्च 2023 अखेर जिल्ह्यातील 125 गावांमध्ये या प्रकल्पांतर्गत 4 हजार 932 शेतकऱ्यांना 12 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना आतापर्यंत देण्यात आलेल्या लाभामध्ये तुषार सिंचन 2 हजार 688 शेतकऱ्यांना 4 कोटी 76 लाख इतका वैयक्तिक लाभ देण्यात आलेला आहे. शेतमाल मूल्य साखळी बळकटीकरण या घटकांतर्गत 44 शेतकरी महिला बचत गट, उत्पादक कंपनी यांना 4 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. तसेच प्रकल्पातील गावांमध्ये मृद व जलसंधारण या घटकांतर्गत 5 कोटी 64 लाख इतका लाभ देण्यात आलेला आहे. प्रकल्पांतर्गत वर्धा जिल्ह्यांमध्ये एकूण 21 कोटी 7 लाख इतका खर्च झालेला आहे.





  Print






News - Wardha




Related Photos