महत्वाच्या बातम्या

 राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत आष्टी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पटकावला रजत पदक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : जागतिक महिला दिनानिमित्त दस का दम अंतर्गत खेलो इंडिया, फर्स्ट वीमेंस स्टेट आर्चरी टूर्नामेंट, अमरावती ला 26 मार्च 2023 पार पडले. खरेतर ह्या स्पर्धा मुळात स्पर्धा नव्हत्याच. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे क्रीडामंत्री यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवात केलेली एक चळवळ होती शासन महिलांप्रती सकारात्मक पाऊल उचलत आहे. महिलांच्या उत्थानासाठी, विशेषतः महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना आपल्यात असलेली कसम, मग ती कुठल्याही क्षेत्रात असो ती दाखवण्यासाठी बाहेर पडावे हाच एकमेव उद्देश जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अंतकरणात बाळगून या राज्य स्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. त्या स्पर्धेत अतिशय मागासलेला व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याने देखील सहभाग दर्शविला. खेलो इंडिया सेंटर आष्टी गडचिरोली, येथील मैदानावर नियमितपणे सराव करणारी धनुर्धारी कु. रितिका चतुर, कु. अंशिक वालदे, कु. संस्कृती बीटपल्लीवार यांनी धनुर्विद्या स्पर्धेत सहभाग दर्शवून सब जूनियर इंडियन राउंड प्रकारात महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी ची धनुर्धर अंशिका वालदे हिने ओवेर ऑल डिस्टेंस प्रकारात रजत पदक पटकावून गडचिरोली जिल्ह्याचे, गावाचे तसेच महाविद्यालयाच नाव उंचाविले. महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी चे प्राचार्य. डॉ. संजय फुलझेले तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे प्राचार्य. शैलेंद्र खराती व धनुर्विद्या प्रशिक्षक प्रा. श्याम कोरडे, सुशीलकुमार अवसरमोल, नितेश डोके, पूजा डोर्लीकर, अरविंद वनकर, रोशन सोळंके, कौमुदी श्रीरामवार तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढ़ील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos