महत्वाच्या बातम्या

 व्हिडिओ कॉल करून दोघांनी संपविले आपले जीवन : घुग्गुस् येथील दुर्दैवी घटना


- उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : व्हिडिओ कॉल करून दोघांनी विष प्राशन केल्याची घटना घडली आले. यात युवतीच्या मृत्यू झाला तर उपचारा दरम्यान युवक ही दगावला. अशी दुर्दैवी घटना घुग्गुस येथे घडली.

घरून लग्नाला विरोध असल्याने घुग्घुस येथील गांधीनगर रहिवासी राकेश जेणेकर वय २७ वर्ष व रामनगर, कामगार वसाहत मधील २४ वर्षीय युवती या प्रेमीयुगुलाने व्हिडीओ कॉल करीत उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला तर मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्याच्या सुध्दा मृत्यू झाला. 

एकाच गावातील रहिवासी असलेल्या राकेश व युवती या प्रेमीयुगलाचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र विवाहाला घरून विरोध होता. त्यामुळे दाेघांनीही विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आत्महत्येचा हा प्रयत्न व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून करण्यात आला होता. शहरातील गांधीनगर निवासी राकेश जेणेकर वय 27 व रामनगर येथे राहणारी युवती हे दोघे प्रियकर- प्रेयसी असल्याची माहिती आहे. दुपारी दोघांनी एकमेकांना व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून संपर्क साधत उंदीर मारण्याचे औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

सदरची बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर अवस्थेत मुलीने प्राण सोडले तर दुसरीकडे राकेश हा खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यात तो दगावला. आत्महत्येमागील कारण अजूनही अस्पष्ट असल्याने पोलीस तपास करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos