महत्वाच्या बातम्या

 काष्ट पूजन ला संगीतमय वातावरण ची निर्मिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : वने, मत्स्य व्यवसाय तथा सांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नाने अयोध्या येथील प्रभू श्री राम यांच्या भव्य अश्या मंदिराच्या निर्मितीला बल्लारपूर येथील काष्ट पाठविण्यात आले त्या प्रित्यर्थ  बल्लारपूर मधून ऐतिहासिक अशी शोभायात्रा काढण्यात आली. सुधीर जनसेवा बहुउद्देशीय संस्था तथा सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर याच्या तर्फे बल्लारपूर शहरांत सर्वात मोठे होर्डिंग लावून पूजा, अर्चना करण्यात आली. त्यांचप्रमाणे शोभायात्रे निमित्त बल्लारपूर शहरांत संस्थेद्वारे शहरातील मुख्य चौकात  संगीत व्यवस्था करून भगवान रामाचे भजन लावण्यात आले असून संपूर्ण वातावरण भक्तिमय करण्यात आले. या संगीतमय, भक्तिमय वातावरणात बल्लारपूर मधील माता, बहिणींनी उदंड असा प्रतिसाद दिला. या भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून बल्लारपूर शहरातील वरिष्ठ पत्रकार व मुख्यध्यापक श्रीनिवास उनिवा, श्रीनिवास मंदिकूट्टा, श्रीनिवास पिसार, रुपेश सिंग, शुभम शेटीया, नारायण सुक्का, प्रताप आसंपेल्ली, सतीश बोकूरी, राजू कुच्चंलवार उपस्थित होते. त्याच प्रमाणे सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सचिव शशिकांत मुंडे, सुधाकर सिक्का, कमल वर्मा, सलीम नबी अहमद, विनोद कोवे, आकाश चौधरी, अनिल देशमुख, रोशन, शुभम, छुटकू भैया, हरीश पेरका, अनिकेत पोतर्लावार, आशिष ईदनुरी, रितेश गुप्ता तसेंच संपूर्ण बल्लारपूर शहरातील सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर च्या माता बहिणी प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos