महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३१ मार्च महत्वाच्या घटना

१६६५ : मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरुवात केली.

१८६७ : डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

१८८९ : आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.

१९०१ : पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकाऱ्यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.

१९६४ : मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.

१९६६ : रशियाने ल्यूना - १० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.

१०७० : १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.

२००१ : सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.

३१ मार्च जन्म

१५०४ : शिखांचे दुसरे गुरु गुरु अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू : २९ मार्च १५५२ )

१५१९ : फ्रान्सचा राजा हेन्टरी (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू : १० जुलै १५५९) 

१५९६ : फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक रेने देकार्त यांचा जन्म. (मृत्यू : ११ फेब्रुवारी १६५०) 

१८४३ : नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू : २ नोव्हेंबर १८८५) 

१७६५ : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू : २६ फेब्रुवारी १८८७)

१८७१ : स्वातंत्र्यसैनिक कर्नाटक सिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू : ३० जुलै १९६०)

१९०२ : भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म. (मृत्यू : ३१ मार्च २०००) 

१९३४ : भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या यांचा जन्म. (मृत्यू : ३१ मे २००९)

१९३८ : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचा जन्म.

१९७२ : ट्विटरचे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स यांचा जन्म.

१९७८ : भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म.

३१ मार्च मृत्यू

१९१३ : अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचे निधन. (जन्म : १७ एप्रिल १८३७)

१९७२ : अभिनेत्री महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी यांचे निधन. (जन्म : १ ऑगस्ट १९३२)

१९८७ : लिनचे सहनिमति चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचे निधन. (जन्म : २७ फेब्रुवारी १८९९)

२००० : भारतीय विद्वान ग्यानी चेतसिंग यांचे निधन. (जन्म : ३१ मार्च १९०२) 

२००२ : भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचे निधन. (जन्म : १३ ऑक्टोबर १९२४)

२००४ : अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरु चरणसिंग तोहरा यांचे निधन. (जन्म : २४ सप्टेंबर १९२४)

२००४ : कोल्हापूरची कला परंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचे निधन. (जन्म : ८ ऑगस्ट १९१२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos