महत्वाच्या बातम्या

 राज्य शासनाच्या कर्माचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार वेतन : शिंदे सरकारचा मोठा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या २२ तारखेपासून दिवाळी सुरू होत असून त्यापूर्वी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने परिपत्रक जारी केले असून ऑक्टोबर महिन्याचे वेतन २१ तारखेला देण्यात येणार असल्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना होईल. वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भातदेखील सूचना देण्यात आल्याचे सरकारने जारी केलेल्या परिपत्रकांत म्हटले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos