अहेरी पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार


- विकास कामांसाठी निधी नसल्याने असंतोष 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /अहेरी
: पंचायत समिती सदस्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार बहाल करावे. पूर्वी तेराव्या वित्त आयोगाचा निधी पंचायत समिती सदस्यांना मिळत होता. तसेच त्यांना कुठे व कसा निधी वापर करण्याचा अधिकार असायचा मात्र शासनाचा आदेशाने  मिळणारा  कुठलाही निधी व त्यांना  काम करण्याचा  कुठलाही अधिकार नसल्याने पंचायत समितीचे सदस्य पद नामधारी असून,  पदाला महत्व नसल्याची खंत व्यक्त करीत अहेरी पंचायत समितीच्या सदस्यांनी काल २१ डिसेंबर रोजी आयोजित मासिक सभा  व कामकाजावर बहिष्कार टाकला. यापुढे  होणाऱ्या मासिक बैठका व कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल असे निवेदन अहेरीचे  तहसीलदार प्रशांत घोरूडे यांच्या मार्फत  राज्याचे मुखमंत्री ना.देवेंद्र फडणवीस याना देण्यात आले.  यांबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी   यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. 
 पंचायत समिती सदस्यांना चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीची पूर्वीप्रमाणे तरतूद करण्यात यावी, जिल्हा निवड समिती मध्ये सभापतीना  सदस्य म्हणून घ्यावे, प्रत्येक पंचायत समिती सदस्यांना आपल्या गणाच्या विकास कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, सभापती, उपसभापती व सदस्यांच्या मानधनात वाढ करून देण्यात यावे आदी  प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत व अधिकार मिळेपर्यंत पंचायत समिती मध्ये होणाऱ्या मासिक बैठकीला बहिष्कार टाकण्यात येईल असा  निर्णय अहेरी पंचायत समितीच्या सभापती सुरेखा आलाम, उपसभापती  राकेश तलांडे, प.स.सदस्य भास्कर तलांडे, प.स.सदस्य  राकेश पन्नेला,प.स.सदस्य  हर्षवर्धन आत्राम, प.स.सदस्या  गीताताई चालुरकर, प.स.सदस्या  शितल दुर्गे, प.स.सदस्या  छाया पोरतेट, प.स.सदस्या  शारदा कोरेत यांनी घेतला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास वेळप्रसंगी राजिनामे देणार

 पंचायत समिती सदस्यांना अधिकार व निधी देण्यात यावा याबाबत महाराष्ट्र राज्यातील  पंचायत समिती सदस्यांची  विचार मंथन बैठक गेल्या महिन्यात यवतमाळ येथे पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा  निर्णय घेण्यात आला. तसेच वेळप्रसंगी राज्यातील सर्व पंचायत समिती सदस्यांनी आपल्या पदाच्या राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-22


Related Photos