कोंढाळा येथे दुचाकीस्वाराला वाचविताना कारचे नियंत्रण सुटल्याने अपघात, २ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) :
  दुचाकी स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना काल २१ डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते १०.०० वाजताच्या  दरम्यान कोंढाळा नजीक घडली. 
 देसाईगंज येथील राजू मोटवणी व नंदू मोटवणी हे एमएच ३३ ए  ५६३५ या क्रमांकाच्या  कारने  वडसा कडे जात होते. दरम्यान दुचाकीस्वार समोर आल्याने कारचा अपघात झाला. कार ही सार्वजनिक विहिरीला जाऊन धडकली.  विहिरीचे कठडे तुटून विहिरीमध्ये घुसली असल्याने कारचा समोरील भाग चेंदा-मेंदा झाला आहे. राजू मोटवणी व नंदू मोटवणी यांना डोक्याला,हात व पायाला मार लागला आहे.  त्यांना त्वरित  रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठून,घटनेची माहिती त्वरित पोलीस स्टेशन देसाईगंज यांना दिली. घटनास्थळी बिट जमादार सयाम व करकाडे यांनी पाहणी करून घटनेचा तपास केला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-22


Related Photos