एमपीएससीच्या परिक्षेसाठी प्रथमच बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली लागू


-९७० विद्यार्थी देणार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा
-२३ डिसेंबर रोजी परीक्षा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निरिक्षक प्रमाणित शाळा व संस्था-रचना व कार्यपध्दती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट-ब चाळणी परिक्षा २०१८ ही परीक्षा २३ डिसेंबर रोजी ११ ते १२ पर्यंत आयोजित करण्यात आली असून भंडारा शहरातील तीन परीक्षा केंद्रावर ९७० विद्यर्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेपासून उमेदवारांकरीता बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करण्यात आली आहे.
जे.एम. पटेल कॉलेज भंडारा केंद्रावर ५०४ , लाल बहादूर शास्त्री ज्युनियर कॉलेज भंडारा या केंद्रावर ३१२ व नगर परिषद गांधी विद्यालय भंडारा केंद्रावर १५४ असे ९७० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सदर परीक्षेच्या कामाकरीता १२४ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षेच्य पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनाकरीता १९ डिसेंबरला प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते. प्रशिक्षणात निवासी उपजिल्हाधिकारी विजय स. भाकरे तसेच उपजिल्हाधिकारी महसूल सुभाष न. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. 
या परीक्षेपासून उमेदवाराकरीता बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. बायोमॅट्रिक पडताळणी उपकेंद्राच्या प्रवेशद्वारावर करण्यात येईल. पडताळणी झाल्याचे प्रमाणित केल्यानंतर उमेदवारांनी सोबत आणलेल्या ओळखपत्राच्य छायांकित प्रतीवर प्रमाणित केल्याचा सही व शिक्का आणि होलोग्राम, तपासणी यंत्रणेमार्फत चिकटविण्यात येणार आहे. त्यानंतरच उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे.
उमेदवारास ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्ट प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रम सोबत आणले अनिवार्य आहे. परीक्षा उपकेंद्रावर सोबत मोबाइल आणण्यास सक्त मनाई करण्यात आली असून प्रत्येक उपकेंद्रावर मोबाईल जॅमर बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक उपकेंद्रावर सीसीटिव्ही प्रणालीद्वारे कामकाजाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये गैरप्रकारचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली असून परीक्षेकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. तसेच परीक्षा उपकेंद्रावर उमेदवाराची पोलीस कर्मचाऱ्याकडून तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असून परीक्षेकरीता जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2018-12-21


Related Photos