शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास तंत्रज्ञानाची मदत गरजेची : पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम


-कृषी व गोंडवन महोत्सव २०१८ चे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली : 
कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचे नवे तंत्र आणि पध्दती माहिती होणार आहेत. याचा उद्देश उत्पादन वृध्दी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबतच सर्वांगीण विकासासाठी होणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोली चे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
 कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कृषी विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी व गोंडवन महोत्सव २०१८ चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. येथील सोनापूर मधील कृषी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात हा ५ दिवसीय महोत्सव होत आहे.
 यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर ,आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषद सदस्य साखरे , बारसागडे, नगर सेवक प्रमोद पिपरे, प्रकल्प संचालक आत्मा डॉ.प्रकाश पवार , जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे,  प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण यंत्रणा कुणाल उदीरवाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी घुगे, जिल्हाअधिक्षक कृषी सौ.धुळे, यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देवून याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
केंद्र शासन किंवा राज्य शासन योजनाचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे त्यासाठी पाहिजे ती मदत करेल. त्यासाठी आपण या जिल्हयांच्या ठिकाणी कृषी व गोंडवन महोत्सवाचे आयोजन केले आहे. आजच्या या विज्ञान युगात शेती कशी सुलभ करता येईल व शेती पासून आपल्याला उदयोग कशे करता येईल ईथे आपल्या पाहिल्याला मिळणार आहेत. म्हणून आपल्या जिल्हयातील शेतकऱ्यांनी  येथे येवून भेट दयावी.
पुढे बोलताना ते म्हणाले की,  आपल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध अवजारे वाटप केले आहे. शेतकऱ्यांना काही अडचणी असतील तर लोकांनी संबधीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.तसेच आपल्या महिला बचत गटांना मिनी राईस मिल देण्याचे आवाहन यावेळी केले.  
डॉ. विजय राठोड यांनी बोलतानी  आपला जिल्हा हा वनाच्छीत जिल्हा आहे.त्यामुळे बचत गटांनी त्यापासून कशाप्रकारे  उत्पादन घेऊन आपल्या बचत गटाची प्रगती कशी सांधता येईल अशाप्रकारची माहिती  यावेळी  दिली.
 आमदार डॉ.देवराव होळी कृषी व गोंडवन महोत्सवात बोलताना म्हणाले की, महिला सक्षमीकरण करणेआवश्यक आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्हयाचा विकास लोकसहभागातून करण्याचा  ध्येय साध्य करावे.यावेळी ते म्हणाले की, सिंचन क्षेंत्रात वाढ आणि उत्पादन वृध्दी शिवाय शेतकरी समृध्द होणार नाही यादृष्टीकोनातून कृषी विभागाने आपल्या योजनाना गती दयावी.
 यावेळी योगिता भांडेकर, योगिता पिपरे , प्रमोद पिपरे यांची समुचित भाषणे झाली.  कार्यक्रमाची प्रास्तावीक डॉ. प्रकाश पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नरेद्र आरेकर व आभार प्रदर्शन कुणाल उदीरवाडे यांनी केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-21


Related Photos