अर्जुनी मोरगाव बिबट शिकार प्रकरण : मानद वन्यजीवरक्षकासह तिघांना अटक


- आरोपीतांना २७ पर्यंत वनकोठडी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अ
र्जुनी मोरगाव तालुक्यातील केळवद केशोरी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक २३३ मध्ये १५ डिसेंबरला बिबट्याची गोळी झाडून शिकार करून त्याचे पंजे  कापून नेण्यात आले . या प्रकरणातील आरोपीचा शोध लावण्यात वनविभागाला यश आले असून यातील मुख्य आरोपी माजी मानद वन्यजीवरक्षक भीमसेन डोंगरवार हा आहे तर  हेमराज मेश्राम रा. सुरबन, मानसिंग नैताम रा. गंधारी यांना ताब्यात घेतले आहे. या तिघांनाही २७ पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे. 
 १५ डिसेंबरला केळवद केशोरीच्या जंगलात बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या वेळी बिबट्याच्या चारही पायाचे पंजे कापून शिकाऱ्यांनी नेल्याचे दिसले.  तपासणीत बिबट्याची गोळी झाडून शिकार केल्याचे निष्पन्न झाले . त्या दिशेने वनविभागाने आपले शोधकार्य सुरु केले होते .  
प्राप्त माहितीनुसार  या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच वनविभागाने हेमराज मेश्राम याला सुरबन येथून तर, मानसिग नैताम याला गंधारी येथील घरून ताब्यात घेतले. या दोघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी भिमसेन डोंगरवार यांचे नाव सांगितले.त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी भिमलेनला धाबेपवनी येथून रात्रीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बंदूक व भाला जप्त करण्यात आला. पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करीत आहेत . 
   Print


News - Gondia | Posted : 2018-12-21


Related Photos