वर्धा शहरात देशी पिस्टल जप्त : जबरी चोरीचा गुन्हा उघड


-दोन आरोपींना अटक 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
भावासह दुचाकी वाहनाने कसाई मोहल्ला येथून न विसावा पाॅईंट मार्गे इतवारा चैकाकडे जात असतांना दोन अनोळखी इसमांनी  त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून फिर्यादीच्या वाहनासमोर स्वतःची गाडी लावली व बंदुकीचा धाक दाखवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला . याबाबत वर्धा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपले तपासचक्र फिरवत आरोपींचा शोध लावून त्यांच्याकडून देशी पिस्टल सह १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .  राकेश मुन्ना पांडे (२७), इम्रान उर्फ ईम्मू शेख जमील (२८) दोन्ही रा. ईतवारा, वर्धा असे आरोपींचे नावे आहेत . 
हकीकत याप्रमाणे आहे की,  २७ डिसेंबर २०१८ रोजी रात्रीच्या सुमारास  फिर्यादी सुधीर कोवा रा. गजानन नगर, वर्धा हे त्यांचा भावासह त्यांचे मोपेड गाडीने कसाई मोहल्ला येथून न विसावा पाॅईंट मार्गे इतवारा चैकाकडे जात असतांना दोन अनोळखी इसम त्यांचे मागून काळया रंगाचे मोटार सायकलवर आले व त्यांना ओव्हरटेक करून फिर्यादीचे गाडीसमोर स्वतःची गाडी आडवी लावली. फिर्यादीचा रस्ता अडवून फिर्यादी व त्याचे भावाला शिवीगाळ केली व लाथाबूक्यांनी मारहाण केली. फिर्यादीस बंदूकीचा धाक दाखवून त्यांचेकडील नगदी ४०० रू, दोन मोबाईल किं. १९ हजार रू, एक सोन्याची अंगठी कि. १५ हजार रू असा एकूण ३४ हजार ४०० रू चा माल बळजबरीने बंदूकीच्या धाकावर चोरून नेला. फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे. वर्धा शहर येथे अप.क्र. २०८०/१८ कलम ३९४ , ३४१ , ५०४ , ५०६ , ३४ भादवि. ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
 सदर गुन्हयामध्ये बंदूकीचा धाक दाखवून जबरीचोरी केल्याने गुन्हयाची गंभीरता लक्षात घेवून  पोलीस अधिक्षक   व  अपर पोलीस अधिक्षक   यांनी सदर गुन्हयाचा दाखल तारखेपासूनच पाठपूरावा केला व गुन्हयातील आरोपी शोधाकरीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक स्था.गु.शा., वर्धा यांनी सदर गंभीर गुन्हयाचे तपासाकामी दोन अधिकारी व २ पथकांची नेमूणक करण्यात आली. 
 याच दरम्यान स्था.गु.शा.चे पथकाला माहिती मिळाली की, यामध्ये सराईत गुन्हेगार राकेश पांडे याचा सहभाग असण्याची व तो बंदूक वापरत आहे. त्यावरून स्था.गु.शा.चे पथकाने केळापूर शिवारातील शेतात एका बंड्यावर लपून रहात आहे अशा माहितीवरून सदर परीसरात सापळा रचून छापा घातला असता त्याठिकाणी राकेश पांडे मिळून आला त्याचे ताब्यातून पल्सर मो.सा. व देशी बनावटीचा कट्टा हस्तगत केला. त्याला गुन्हयातील अन्य साथीदाराबाबत माहिती विचारून इतवारा बाजार परीसरातून इम्रान उर्फ इम्मू यांस ताब्यात घेतले. दोघांनाही गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता सदर आरोपीतांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली . आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली व त्यांचेजवळून हातबनावटी पिस्टल व २ जिवंत राऊंड कि.२० हजार दोन मोबाईल कि. १९ हजार रू, पल्सर मोटार सायकल एमएच-३२ /ए.सी.-९०७३ असा असा एकूण १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला. पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर तर्फे करण्यात येत आहे. 
 सदर कारवाई पोलीस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली व  अपर पोलीस अधीक्षक  निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  निलेष ब्राम्हणे, स्थागुशा , वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. पंकज पवार, महेंद्र इंगळे व गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचारी स.फौ. अशोक साबळे, पो.हवा. निरंजन वरभे, राजेंद्र ठाकूर, दिनेश कांबळे, ना.पो.शि. रामकृष्ण इंगळे, पो.शि. राकेश आष्टनकर, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, प्रदीप वाघ, सायबरचे दिनेश बोथकर , म.पो.शि. भारती ठाकरे, चालक भूषण पूरी, आत्माराम भोयर, सर्व नेमणूक स्था. गु. शा. वर्धा यांनी केेेेली. 

   Print


News - Wardha | Posted : 2018-12-21


Related Photos