महत्वाच्या बातम्या

 न्यायालयीन खटल्यावेळी हिंदुस्थानात प्रथमच चॅटजीपीटीचा वापर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : हिंदुस्थानात पहिल्यांदाच न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीवेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने एका आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना चॅटजीपीटीचा वापर केला आहे.

न्यायमूर्ती अनूप चितकारा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर दंगल, धमकी, हत्या आणि गुन्हेगारी कट रचणे या आरोपांखाली २०२० च्या जून महिन्यात अटक झालेल्या एका आरोपीच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. या वेळी जामीन मंजूर करावा किंवा नाही, या मुद्द्यावर जगभरातील न्यायशास्त्राविषयी चॅटजीपीटीकडे सल्ला विचारण्यात आला. यावेळी न्यायमूर्तींनी चॅटजीपीटीला विचारले की, जेव्हा हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपण हल्ला केला असेल, तेव्हा जामीन अर्जाविषय न्यायशास्त्र काय सांगते?

त्यावर चॅटबॉटकडून उत्तर आले की, अशा खटल्यांमध्ये संबंधित परिस्थिती आणि त्या त्या देशांचे कायदे तसेच नियम यांच्यावर निर्णय अवलंबून असेल. जर हल्लेखोरांवर खून, प्राणघातक हल्ला, एखाद्याला जखमी करने किंवा समाजाला धोकादायक अशी कृती घडली असेल तर अशा आरोपीचा जामीन न्यायाधीश नामंजूर करू शकतात किंवा जामिनासाठीच्या मुचलक्याची रक्कम वाढवू शकतो, असे उत्तर चॅटबॉटने नोंदवले.

चॅट जीपीटीचा वापर करण्याबाबत न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली. चॅट जीपीटीचा कोणताही संदर्भ आणि करण्यात आलेले अवलोकन याचा उद्देश फक्त जामिनाबाबतच्या कायद्याचे एक स्पष्ट चित्र सादर करणे हा होता, असे स्पष्टीकरण देत न्यायमूर्ती चितकारा यांनी आरोपीचा जामीन फेटाळला.





  Print






News - Rajy




Related Photos