महत्वाच्या बातम्या

 चार महिने नि:शुल्क निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने मध्यप्रदेशातील छिदवाडा येथील फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इंस्टीटयुट येथे फुटवेअर अँड प्रॉडक्शन या विषयावर चार महिने निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण नि:शुल्क मिळणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान मोफत राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाचे आशीष वानखेडे, मो.नं ९८९३४७५८०० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos