महत्वाच्या बातम्या

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : क्रीडा विभागामार्फत क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार / जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. 

१४ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी  नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन स्वतंत्र  वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेऊन, संपूर्ण भरुन संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे  सादर करावे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे.

अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या इच्छुक क्रीडा  मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत क्रीडा विभागामार्फत आवाहन  करण्यात  आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos