महत्वाच्या बातम्या

 शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज समान संधी केंद्रामार्फत भरुन घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलवरुन भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचे प्रलंबित असलेले अर्ज महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामार्फत भरुन घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे १०० टक्के अर्ज भरल्या जातील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता योजनेचे नवीन व नुतणीकरणाचे अर्ज भरण्याकरीता २१ सप्टेंबर पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले, असून अंतीम मुदत ३१ मार्च देण्यात आली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील अपेक्षित १० हजार अर्जापैकी ९ हजार २६७ अर्ज भरण्यात आलेले आहे. तसेच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गाचे अपेक्षित ३२ हजार अर्जापैकी २८ हजार २४२ अर्जाची नोंदणी झालेली आहे. परंतु महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जातीचे १ हजार ११३ तर इमावचे ५ हजार २९० इतके अर्ज प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित

असलेले शिष्यवृत्तीचे अर्ज ३१ मार्च पर्यंत पाठवावे, असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos